गुणवंत विद्यार्थी व सभासद सत्कार समारंभ
संस्थेच्या गुणवान सभासदांचे व त्यांच्या गुणवान मुलांचे कौतुक करणे आम्हांला नेहमीच अभिमानास्पद वाटते. सन 2014-15 या शैक्षणिक वर्षात इ. 10वी, इ. 12 वी, पदवी, पदवीका व पदव्यूत्तर परिक्षेमध्ये उत्तम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या सभासदांचा व त्यांच्या पाल्यांचा त्याचप्रमाणे सन 2014-15 या वर्षात राष्ट्रीय / राज्य / जिल्हास्तरावर कला / क्रिडा / सांस्कृतिक क्षेत्रात विशेष गुणवत्ता अथवा उल्लेखनीय सन्मान मिळविलेल्या सभासदांचा व त्यांच्या पाल्यांचा सत्कार शनिवार दिनांक 05 सप्टेंबर 2015 रोजी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती श्री. मोहित शाह साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती मीता शाह मॅडम तसेच इतर सन्माननिय न्यायमूर्ती श्री. एन. एच. पाटील साहेब, श्री. एस. सी. धर्माधिकारी साहेब, श्रीमती शालीनी फणसाळकर – जोशी मॅडम, श्री. मंगेश पाटील साहेब – रजिस्ट्रार जनरल, श्री. डी. व्ही. सावंत साहेब प्रोथोनोटरी अॅण्ड सिनिअर मास्टर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. याप्रसंगी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती व इतर सन्माननीय न्यायमूर्तींनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या गुणगौरव सोहळयाचे सुत्रसंचालन श्री. दीपक धुमाळ, श्रीमती सीमा देसाई व श्री. रवि पवार यांनी केले. तसेच हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्याकरीता संस्थेचे सभासद व संचालक मंडळ यांनी विशेष प्रयत्न केले.