कर्मचारी वर्गाची आर्थिक परिस्थिती सुधारावी व त्यांना बचत करण्याची सवय लागावी या उच्च विचाराने प्रेरित होऊन श्री. व्ही. जी. गद्रे मुख्य प्रवर्तक यांनी तत्कालीन संस्थापक सर्वश्री. ताहीर अली फतेही, ए. आर. नारायण अय्यर, डी. व्ही.सबनीस, व्ही. ए. पाणंदीकर, ए. आर. नाडकर्णी, एफ. आर. काझी, सी. बी. बनसोडे आणि डब्ल्यू. एस. सप्रे यांच्या सहकार्याने दिनांक 19 जानेवारी 1931 या दिवषी संस्थेची स्थापना केली.
प्रथम वर्षी संस्थेच्या पटावर 183 सभासद होते आणि अधिकृत भागभांडवल रूपये 50,000/- होते तथापि आज 86 वर्षानंतर संस्थेचे एकूण 2184 सभासद असून संस्थेचे अधिकृत भागभांडवल रूपये 20 कोटी इतके आहे. काळानूसार उच्च न्यायालयाच्या कर्मच-यांबरोबर नगर दिवाणी आणि सत्र न्यायालय, कुटूंब न्यायालय, मोटार अपघात दावा प्राधिकरण, मॅट, शेरीफ ऑफिस, सरकारी वकील कार्यालये इत्यादीमध्ये कार्यरत असणारे कर्मचारीसुध्दा आमच्या संस्थेचे सभासद आहेत.
संस्थेचा राखीव निधी 3 कोटी 11 लाख इतका असून संस्थेचे आज रोजी खेळते भांडवल रू. 27 कोटी 63 लाख एवढे आहे आणि गेली अनेक वर्षे संस्थेला सलग ‘‘अ’’ वर्गाचा मान मिळाला आहे.
संस्थेच्या कामाचे 100% संगणकीकरण झालेले असून सभासदांसाठी विशेष कर्ज रू. 10 लाख, सर्वसाधारण कर्ज रू. 5 लाख , अल्पमुदत कर्ज रू. 1 लाख आणि तातडीचे कर्ज रू. 20,000/- उपलब्ध आहे.
संस्थेच्या सभासदांना सभासद कल्याण निधी योजने अंतर्गत त्यांच्या नियत वयोमानानुसार सेवेतून निवृत्त / स्वेच्छेने निवृत्त झालेल्या व सलग सभासदत्वाची 15 वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांना रू.5000/- आणि 20 वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांना रू. 7500/- एवढी रक्कम देण्यात येते तसेच यानिधीतून सभासद किंवा सभासदाच्या कुटुंबातील व्यक्तीस रूग्णालयात सलग 24 तास वास्वव्य झाले असल्यास त्या सभासदाला रू. 5000/- इतकी ना परतावा वैद्यकीय मदत देण्यात येते.